एप्रिल २०२६ • सकाळ
ग्रामीण भागातील प्रत्येक माणसाला सन्मानाने जगता यावे, यासाठी ही संस्था अहोरात्र कष्ट करत आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न असोत किंवा ग्रामीण आरोग्य, आम्ही मातीशी नातं जोडून काम करतो.
ग्रामीण जनतेचा सर्वांगीण विकास आणि सामाजिक न्याय.
प्रत्येक गाव स्वावलंबी आणि समृद्ध बनवणे.
संस्थापक व सामाजिक कार्यकर्ते
राज पार्टे यांनी आपल्या संघर्षातून ग्रामीण भागातील अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत. उपोषणे आणि आंदोलने ही केवळ आंदोलने नसून सामान्यांच्या आशा आहेत, असे ते मानतात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शेकडो गावे आज स्वावलंबी होण्याच्या वाटेवर आहेत.
अन्यायाविरुद्ध पुकारलेला एल्गार!
अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा आणि संघटनेचा पुढाकार. घरकुल लाभार्थ्यांना मोफत वाळूचा मोठा दिलासा.
गौरी-गणपती सणापूर्वी तालुक्यातील मुख्य रस्त्यांची दुरुस्ती व स्वच्छतेसाठी PWD विभागाकडे यशस्वी पाठपुरावा.
खाजगी टॅक्सी चालकांच्या लूटमारीला चाप लावण्यासाठी एसटी प्रशासनाकडे पाठपुरावा करून बस सेवा पुन्हा सुरू केली.
झोपलेल्या आरोग्य विभागाला जागे करण्यासाठी आणि ग्रामीण आरोग्य सुविधा सुधारण्यासाठी संघटनेचा यशस्वी मोर्चा.
कर्मचाऱ्यांकडून झालेली फसवणूक रोखून पैसे वसूल केले आणि अन्यायकारक स्मार्ट मीटरविरोधी यशस्वी लढा उभारला.
पोलादपूर तालुक्यातील दरडग्रस्तांच्या हक्काच्या घरांसाठी आणि कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी पुकारलेला बुलंद लढा.
अमराठी अधिकाऱ्यांना मराठीची तंबी आणि आजारी पेन्शनधारकांना घरपोच सेवा मिळवून दिली.

बोरज येथे वारकरी संप्रदाय व मान्यवरांच्या उपस्थितीत २०२६ च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन.

पोलादपूर एस.टी. स्टँड परिसरात व्यापक स्वच्छता मोहीम राबवून "स्वच्छ पोलादपूर, सुंदर पोलादपूर" हा संकल्प सिद्ध करण्याचा प्रयत्न.
दुर्गम भागातील गरजू विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तके आणि इतर शालेय साहित्याचे विनामूल्य वाटप करण्यात आले.

कापडे येथे भाविकांसाठी मोफत आरोग्य तपासणी आणि औषधोपचार शिबिराचे यशस्वी आयोजन.

पोलादपूर शहरात येणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी शहरात जागा निवडून शौचालय उभारण्याचे महत्त्वाचे पाऊल.

पितळवाडी प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरात व्यापक स्वच्छता मोहीम राबवून स्वच्छतेचा संदेश देण्यात आला.
एप्रिल २०२६ • सकाळ
२८ डिसेंबर २०२५ • लोकमत
०८ ऑगस्ट २०२५ • दैनिक सकाळ
१० ऑगस्ट २०२५ • पुढारी
तुमचं एक पाऊल ग्रामीण भागाचा नवा चेहरा घडवेल. आमच्याशी जोडा.